Posts

Showing posts from July, 2020

संवाद लेखन - तो आणि ती

संवाद लेखन - तो आणि ती लेखन - चेतन जोग (पुणे) http://www.instagram.com/chetan_jog1992 प्रसंग : ' तो ' सततच्या आर्थिक चणचण आणि वैयक्तिक अडचणी यामुळे आपल्या जीवनाला कंटाळून हे आयुष्य संपवायला निघालेला असतो. स्थळ : रेल्वे स्टेशन. वेळ : संध्याकाळी सहा वाजता. ( समोरून भरधाव वेगात रेल्वे येणार अशी सूचना मिळते. तो उडी मारणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजतो. अत्यंत रागीट मुद्रेने तो मोबाईल कडे पाहतो. ती गाडी निघून जाते. मग पुढील गाडी येईपर्यंत कोण आहे म्हणून तो फोन उचलतो. ) तो : हॅलो ?? ती : अरे कुठे आहेस तू ? मला असे समजले की तू हे जीवन संपवायला निघालेला आहेस ?? तो : होय. खर आहे हे. मी आजच हे जीवन संपवत आहे. त्यासाठी मी कोणालाही जबाबदार धरत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो पक्का झालेला आहे. ती : वेडा झालास का रे ?? इतके सुंदर आयुष्य देवाने आपल्याला दिलेले आहे आणि ते तू असेच व्यर्थ घालवणार आहेस का ? या जगात कोणाला दुःखे नाहीत रे; पण म्हणून काय प्रत्येकाने हाच एक मार्ग पत्करणे हे योग्य आहे का ? तो : मग मी काय करू ?? कोणासाठी जगायचं मी ? कोण आहे माझं या जगात ? ...

गो ग्रास :- एक कालवश होणारी संकल्पना

गोग्रास - एक कालवश होणारी संकल्पना चेतन जोग (पुणे) http://www.instagram.com/chetan_jog1992 गोग्रास !! बऱ्याच दिवसांपासून या विषयावर काहीतरी लेखन करावे असे माझ्या मनात होते. योगायोगाने विषय मिळाला त्यामुळे मी आज हा लेखनप्रपंच आपल्यापुढे मांडत आहे. सदर लेख हा चार मुख्य भागात विभागला आहे. १) गोग्रास ही संकल्पना २) याबाबत थोडी विस्तृत माहिती ३) एक छोटी आठवण ४) या विषयाचा दुसरा पैलू आणि तात्पर्य चला तर सुरुवात करूया. १) गो ग्रास ही संकल्पना :- गो ग्रास या नावातच या संकल्पनेचा अर्थ दडला आहे. गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे घास. गायीला घास देणे म्हणजे गो- ग्रास. यात अनेक पद्धती आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात ही प्रथा पूर्वापार पासून चालत आली आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोकण भागात आजही दुपारच्या भोजना अगोदर गायीला गोग्रास घालतात. यात मुख्य म्हणजे इतरांसाठी जे जेवण केले जाते त्याचाच लहान भाग व सोबत गायीसाठीचे थोडे खाणे असा समावेश असतो. एकदा गायीने हे खाल्ले की मग घरातील इतर सदस्य भोजनासाठी सुरुवात करतात. २) याबाबत थोडी विस्तृत माहिती :- भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये गाय ह...