किल्ले कोहोज- एक थरारक आणि रमणीय अनुभव
पावसाळा सुरु झाला कि साहजिकच त्या पावसाचा आनंद घेत भटकंती करायची म्हणून अनेक पर्यटक ट्रेकर्स यांची पावले गड,किल्ले यांच्याकडे वळतात. किल्ले कोहोज हा तसा अपरिचित पण पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मनोरी या डॉन गावलगतचा विस्तीर्ण असा किल्ला अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. या किल्ल्याला इतिहास तसा फारसा नाहीच पण तरीही या किल्ल्या बाबत सांगायचे म्हणजे :- गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बर्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला. तर अशा या कोहोज किल्ल्याला भेट देण्याचा मानस ठरला.आयोजक होते - आमची वसई सामाजिक संस्था आणि ट्रेकिंग ग्रुप. दिवस ठरला २४ जुन २०१८ सकाळी ७ वाजता. जसे या ट्रेक साठी नोंदणीचे दिवस कमी राहिले तसे तब्बल १३० जणांनी पटापट पैसे जमा करून आपली नावे निश्चित केली. अखेर रविवारचा दिवस उजाडला. या ट्रेक साठी वसई आणि विरार दोन्ही ठि...